योगीराज वाघमारेच्या खुन्यांना अटक करा : युवा आंदोलन संघटनेची मागणी

योगीराज वाघमारेच्या खुन्यांना अटक करा : युवा आंदोलन


संघटनेची मागणी


 


 


लातूर - प्रतिनिधी 


29 Aug 2020


( गालीब बेग )


 भारतातील पोलिस यंत्रणेवर काही न काही कारणामुळे सतत प्रश्न उठवले जातात. बर्याच अंशाने ते खरेही आहेत. पोलिस खाते हे कामात दिरंगाई , भ्रष्टाचार , सत्ताधारी किंवा धनदांडग्याच्या प्रभावात काम करणे इ . अनेक कारणामुळे चर्चेत असते. याला काहीच इमानदार व प्रामाणिक आधिकारी अपवाद असतात. आज अशीच एक मोठी घटना समोर आली आहे. पोलिसांच्या दिरंगाईमुळे व अनिच्छेमुळे खुन करून राजरोसपणे कॉलर टाईट करून फिरणार्या आरोपींना अटक होत नाहीये. याबाबत सविस्तर वृत्त असे की , मौजे भतनवाडी  ता. अंबेजोगाई जि. बीड  येथे राहणारे योगीराज वाघमारे यांची दि 23 जुलै 2020 रोजी निवाडा पाटी दत्त मंदिराजवळ संगनमताने आरोपी दिपक नरसिंगे व माउली नरसिंगे यांनी हत्या केली व या हत्येस अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला. अपघाताचा भास निर्माण करण्यासाठी योगीराजच्या मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यानी रेणापुर पोलिस ठाण्यात खुनाची तक्रार नोंदवली व मृताचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर दि 11 Aug 2020 रोजी रेणापुर पोलिस ठाण्यातच खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र त्यानंतर आरोपीला पकडण्याच्या दिशेनी पोलिसांनी काहीच हालचाल केलेली नाही. या संदर्भात आरोपींना तात्काळ अटक व्हावी या मागणीचे निवेदन युवा आंदोलन संघटनेतर्फे पोलिस अधीक्षक लातूर यांना देण्यात आले असुन निवेदनावर काशिनाथ कांबळे , अशोक पालके, युवराज वाघमारे, रामराजे वाघमारे , अनंत झुंझाटे आदीच्या स्वाक्षर्या आहेत