सुमेध कांबळे यांना PHD प्रदान
लातूर - प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे दयानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी सुमेध कांबळे यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली.प्रा. डॉ ब्रिजमोहन दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली " मराठवाड्यातील अनुसूचित जातीतील उद्योजकांच्या शासकीय योजनेमार्फत झालेला विकास : एक अभ्यास " या शीर्षकाखाली त्यांनी स्वा रा ती म विद्यापीठास प्रबंध सादर केला होता.हा प्रबंध विद्यापीठाने स्वीकारून त्याना व्यवस्थापन शास्त्रात पी. एच डी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल डॉ देवेंद्रनाथ मिश्रा , डॉ राजेश शिंदे, डॉ जोती शेट्टी आदीनी अभिनंदन केले.